Pune : कोंढव्यात भवानी पेठेतील गुन्हेगाराचा खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात खुन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अजय दादु खुळे (वय ३०, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) असे खुन झालेल्याचे नाव आहे.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, कोंढव्यातील शिवनेरीनगरमधील पार्थी मैदानाजवळील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याचे सकाळी फिरायला जाणार्‍यांनी पाहिले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. पोलिसांनी जाऊन मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या छातीवर, चेहर्‍यावर, पाठीवर वार केले असल्याचे आढळून आले.

त्याच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्यावरुन खुळे यांची ओळख पटली. अजय खुळे याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like