पुण्यात मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांनी तीन संशयिताना पकडले आहे.

शोएब मजीद शेख (वय 27) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान यातील आरोपी व शोएब एकाच परिसरातील आहेत. त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. शोएब याने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरूच होते.

दरम्यान मध्यरात्री शोएब भेकराईनगर मध्ये असताना तिघांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून त्याचा खून केला. तसेच पसार झाले. हा प्रकार समोर येताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीत शोध मोहीम राबवत तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान शोएब हा सरकार राज नावाचा ग्रुप चालवत होता. तोच प्रमुख देखील होता.

You might also like