पुण्यातील येरवड्यात पुन्हा एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून, 15 जणांच्या टोळक्याने केले सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी किरकोळ एका केटरिंग व्यवसायिकाच्या खुनाची घटना ताजी असताना पून्हा येरवडा भागात सराईत गुन्हेगाराचा तरुणाचा सपासप वारकरून निर्घृण खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे, त्याला 15 ते 16 जणांच्या टोळक्याने मारले आहे.

नितीन शिवाजी कसबे (वय 24) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कसबे हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारहाणीसह वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान मध्यरात्री नितीन हा येथील सादल बाबा चौकात आला असताना अचानक हातात कोयते घेऊन 15 ते 16 जणांचे टोळके आले. त्यांनी शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात आणि तोंडावर सपासप वार करून त्याचा खून केला. काही वेळाचतच ही माहिती येरवडा पोलिसांना समजली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीत शोध मोहीम राबवून त्यातील चौघांना पडकण्यात आले आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे.

दरम्यान खुनाचा प्रकार गुन्हेगारीच्या वर्चस्व वादातून घडला आहे. यातील आरोपीचे आणि नितीन याचे वाद झाले होते. त्यावेळी त्याच्यावरून त्याचा खून झाला असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.