Pune : सासूच्या प्रियकराशी सूनेचे प्रेमसंबंध असल्याचा संशय, सासरच्या मंडळींनी काटाच काढला, केला आत्महत्येचा बनाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासूच्या प्रियकरासोबतच अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पती आणि सासू यांच्यासह सासरकडील लोकांनी बेदम मारहाण करून महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर मृतदेह घरातील लोखंडी अँगलला लटकावून तिने गळफास घेतल्याचा बनाव सासरच्या मंडळींकडून करण्यात आला होता.. मात्र, पोलिसांनी बनाव उघड करत चौघांना अटक केली.

राणी किरण भोंग (रा. निमगाव केतकी) असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी शोभा ज्ञानदेव भोंग, बाळू ज्ञानदेव भोंग, सुनील बाळू भोंग आणि किरण बाळू भोंग याांना अटक केली आहे. याबाबत सावित्री उर्फ आक्काबाई हरी नाळे (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राणी यांचा किरण भोंग यांच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर त्या सासरी नांदत होत्या. या दरम्यान राणी हिची चुलत सासू शोभा हिच्या प्रियकराशी तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय आरोपींना होता. या संशयातून त्यांनी राणी हिला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिची खून केला. तसेच यानंतर आरोपींनी राणी हिने आत्महत्या केली असल्याचा बनाव करत घरातील एका लोखंडी अँगलला ओढनीने मृतदेह लटकवला. त्यानंतर खिडकीतून बाहेर येऊन तिने गळफास घेतल्याचा बनाव केला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.