Pune : पुण्यात रिक्षा चालकाकडून मित्रावर सपासप वार, शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू; दिले होते 10 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षा चालकाने आपल्या इस्त्री करणारा मित्र शर्मा याला दिलेले 10 लाख रुपये त्याने परत न केल्याने झालेल्या वादातून शर्मावर कोयत्याने सपासप वारकरून खून केला आहे. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला होता. शर्मावर उपचार सुरू असताना काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढवले आहे.

इंद्रनील चंद्रभूषण शर्मा (वय 40) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण शंकर कडू (वय 37) याला अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा रिक्षा चालक आहे. तर इंद्रनील हा इस्त्री करायचा. त्यांची ओळख होती. दरम्यान प्रवीण याच्याकडून इंद्रनील याने उसने म्हणून 10 लाख रुपये घेतले होते. पण तो परत देत नव्हता, असे पोलिसांना प्रवीण याने सांगितले आहे. तो पैसे परत देत नसल्याने त्यांच्यात वादावादी होत असत.
गेल्या महिन्यात (दि. 22 मार्च) पुन्हा पैश्यांच्या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले. यावेळी प्रवीण याने तीक्ष्ण हत्यारांने इंद्रनील याच्यावर वार केले.

त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून प्रवीण याला अटक केली होती. त्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर इंद्रनील याच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचे कलम वाढविले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब झरेकर हे करत आहेत.