धक्‍कादायक ! पुण्यात नियोजित वधू आणि तिच्या आईवर चाकूने सपासप वार, एकीचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – घरगुती वादातून युवकाने नियोजित वधू आणि तिच्या आईवर चाकूने सपासप वार केल्याची धक्‍कादायक घटना मंगळवारी दुपारी गणेश पेठ परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून चाकू हल्‍ला करणार्‍या युवकाला अटक केली आहे.

नाझनीन सादिक शेख (१८) असे चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर तिची आई हमिदास सादिक शेख (४५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. फरासखाना पोलिसांनी हल्‍ला करणार्‍या शरीफ रझाक शेख (१८) याला खूनाच्या गुन्हयात अटक केली आहे. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाझनीन आणि शरीफ यांचा विवाह होणार होता. मात्र, मंगळवारी अचानकपणे त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाले. त्यानंतर आक्रमक बनलेल्या शरीफने नाझनीन आणि हमीदा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नाझनीनचा मृत्यू झाला. हमीदा गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शरीफला तात्काळ अटक केली आहे. त्याने नेमका कोणत्या कारणामुळे नाझनीन आणि तिच्या आईवर हल्‍ला केला याबाबत सखोल तपास चालू असल्याची माहिती घेण्याचे काम चालू आहे. गुन्हयाचा पुढील तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त