राहत्या घरात मृतदेह सापडलेल्या ‘त्या’ तरुणीचा खुनच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहत्या घरात सापडलेल्या उच्च शिक्षीत तरुणीचा खून झाल्याचे समोर आले असून, तिच्या गळा दाबून खून केल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले आहे. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमाही आढळून आल्या आहेत. दरम्यान, संवेदनशील घटनेत मात्र, पोलीस असंवेदनशील असल्याचे पाहिला मिळाले.

तेजसा श्यामराव पायाळ (वय.29) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. डॉक्टरांच्या अहवालानंतर याप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मुळची बीड येथील आहे. एमबीए शिक्षण पुर्ण झाले आहे. ती नोकरीच्या शोधात होती. माणिकबाग येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. आई, बहिण आणि ती अशा येथे राहत होत्या.

दरम्यान दिवाळीनिमित्त हे सर्वजन गावी गेले. त्यानंतर तरुणी एकटीच परत आली. दरम्यान सोमवारी पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने कॉल करुन माहिती दिली होती. त्यानूसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा खोलुन आत प्रवेश केला. तेव्हा ती गादीवर मृतावस्थेत आढळली. तर पंख्याच्या हुकाला ओढणी बांधल्याचे आढळून आले. तीच्या बेडरुमचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत होता. तसेच घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. घटनास्थळी काही मद्याच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत. तिला ससून रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर तीचा गळा दाबून खून करण्यात आला असे स्पष्ट झाले आहे.

शवविच्छेदनाचा अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घरातील वस्तूंचाही पंचनामा केला गेला असून, पोलीस तपास करत असल्याचे परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like