Pune : शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झालेल्या ‘त्या’ वकिलाचा खून, ताम्हिणी घाटात टाकला होता मृतदेह, तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झालेल्या त्या वकिलाचा खुनकरून मृतदेह ताम्हिणी घाटात नेहून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दृश्यम चित्रपटाच्या कथेनुसार हा खून झाला असल्याचे समजते. यामध्ये अटक केलेला एक आरोपी शिवाजीनगर न्यायालयातच वकिली करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोरे आणि त्या आरोपीत 2018 मध्ये लाच प्रकरणात तक्रार दिल्यावरून वाद झाले होते.

याप्रकरणी कपिल विलास फलके (वय 34, चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28, आष्टी, जि. बीड), रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात उमेश चंद्रशेखर मोरे (वय 33, रा. धनकवडी) असे अपहरण आणि खून झालेल्या वकिलाचे नाव आहे.

राहुल शिंदे हे वकील आहेत. ते शिवाजीनगर न्यायालयात वकिली करतात. तर आरोपी कपिल फलके आणि शेंडे यांच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. शेंडे याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल. त्यात मयत मोरे हे तक्रारदार होते. या गुन्ह्याला बहुचर्चित शहरातील एका जमिनीच्या वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी (दि. 1 ऑक्टोबर) उमेश मोरे यांचे पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातून अपहरण झाले होते. जमिनीच्या वादातून त्यांच्यात वाद होते. या वादातूनच 1 ऑक्टोबर रोजी उमेश मोरे यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ताम्हिणी घाटात मृतदेह नेला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला. त्यानंतर आरोपी पसार झाले. दरम्यान यातील एका आरोपींनी पोलिसांना चकमा देण्यासाठी मोबाईल ट्रकमध्ये टाकून दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. यातील एका आरोपीला पकडले त्यानंतर तिघांना पकडण्यात आले. या खुनाच्या गुन्ह्याबाबत अधिक माहिती देणे पोलीस अधिकाऱ्यांनी टाळले आहे, त्यामुळे पोलीस नेमकी माहिती देण्यात टाळत आहेत आणि कोणती माहिती अद्याप मिळालेले नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.