Pune : कॉलेजच्या मैत्रीणीशी केला दुसरा विवाह, टुरिस्ट व्यावसायिकाकडून प्रेयसीचा गळा दाबून खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कॉलेजची मैत्रीण असणाऱ्या तरुणीसोबतच दुसरा विवाह करणाऱ्या प्रियकराने तीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी प्रियकर पतीला ताब्यात घेतले आहे.

अपर्णा महाडिक (वय 36, रा. सहरा कॉर्नर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी
सुरेंद्र प्रकाश साळुंखे (वय 42, रा. हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र याचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. त्याची अपर्णा ही कॉलेज जीवनापासून मैत्रीण होती. नंतर त्यांचे प्रेम संबंध झाले. यादरम्यान सुरेंद्र याचा दुसऱ्या एका मुलीशी विवाह झाला. त्यानंतर देखील सुरेंद्र याने अपर्णा हिच्यासोबत विवाह केला. तो दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. पहिल्या पत्नीला चार आपत्य आहेत.

दरम्यान घरघुती कारणावरून अपर्णा व सुरेंद्र यांच्यात भाडन झाले होते. या रागातच सुरेंद्र याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. दरम्यान शेजारच्या नागरिकांनी काही तरी गडबड असल्याची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे आणि त्यांच्या पथकाने धाव घेतली. त्यावेळी खुनाची घटना उघडकीस आली. पोलिसांनी शोध घेत सुरेंद्र याला काही तासात पकडले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.