पुण्यात आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा खून, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे (फुगेवाडी) : पोलीसनामा ऑनलाइन – पती वेडसर वागू लागल्याने सासरी आलेल्या गर्भवती पत्नीचा पतीने मानेवर वार करून खून केला. फुगेवाडी येथे रविवारी (दि. २५) ही घटना घडली. अडीच आणि साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यांसमोरच पतीने पत्नीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूजा प्रविण गेवंदे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून प्रविण उर्फ गोपाल गेवंदे असे आरोपी पतीचे नाव आहे.

पतीला पुण्याच्या ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोलमजुरी करणारा पती गेल्या काही दिवसांपासून वेडसर वागत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी पत्नीला कळविले. पत्नी आठ महिन्यांची गर्भवती असल्याने औरंगाबाद येथे माहेरी गेली होती. पती आजारी असल्याने ती आजच सासरी आली होती.

घरात (पत्राशेड) चहा करीत असताना तो पाठीमागून आला. तेव्हा आईच्या जवळ दोन लहान मुले बसले होते. त्याने चहा बनविणाऱ्या पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. दोन्ही लहान मुलांनी ही बाब घराबाहेर बसलेल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कुटुंबियांनी पोलिसांच्या मदतीने सुरवातीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे पत्नीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. तर पतीला ससून सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like