पुणे जिल्ह्यातील रांजणी येथे धारदार शस्त्राने सपासप वार करून महिलेचा खून; प्रचंड खळबळ

मंचर / रांजणी : पोलीसनामा ऑनलाइन टीम – येथील थोरांदळे हद्दीत वन विभागाच्या हद्दीतील रानात बाजरीची राखण करण्यासाठी आलेल्या ठाकर समाजाच्या ३२ वर्षीय महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. द्रौपदाबाई हरिभाऊ गिरहे (वय. ३२, रा. हिवरगाव, ता. संगमनेर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिची आई नंदाबाई पोपट केदार (रा. हिवरगाव संगमनेर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.२६) सायंकाळी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणी भागात नंदाबाई केदार आणि त्यांचे कुटुंब दरवर्षी दरवर्षी संगमनेर येथून येत असतात. यंदाही मंगळवारी (दि. 25) द्रौपदाबाई, तिचा मुलगा व नंदाबाईचा मुलगा रांजणी येथील बाळू वाघ यांच्या शेतात बाजरी काढण्यासाठी गेले होते. त्यानंतर रात्री द्रौपदाबाई या मांजरवाडी येथील पाहुण्यांकडे भाजीपाला आणण्यासाठी जात असल्याचे सांगत घरातून बाहेर पडल्या. मात्र त्या परतल्या नाहीत. दुसर्‍या दिवशी नंदाबाई केदार व गिर्हे कुटुंबीयांनी द्रौपदाबाई यांचा शोध घेत होते.

त्यावेळी त्यांना थोरांदळ हद्दीत हॉटेल सरगमच्या पाठीमागे तीस ते पस्तीस वर्षांची महिला मृतावस्थेत आढळल्याचे समजले. कुटुबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेह द्रौपदाबाईचाच असल्याची खात्री केली. द्रौपदाबाईच्या यांच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत आहे. या खुनामागील कारण अस्पष्ट असून घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पोलिसांना सूचना केल्या.