Pune : कोंढाव्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून, प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोंढव्यातील पार्थिग्राउंड जवळील पाण्याच्या परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अद्याप या तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिस घटनास्थळी धाव घेतली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा येथे पार्थि ग्राउंड आहे. येथेच पाण्याची टाकी आहे. सकाळी काहीजण फिरण्यास आले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा डोके व चेहरा दगडाने ठेचला असल्याचे दिसून आले. अद्याप या तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नवले ब्रिजजवळ एका तरुणाचा खून केल्यानंतर त्याचे हात-पाय दोरीने बांधून पोत्यात मृतदेह टाकून दिला होता. त्याची देखील ओळख पटलेली नाही. पोलीस त्याचा तपास करत असताना आता आणखी एक अनोळखी खूनाचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात प्रचंड दशहत पसरली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like