Pune : गरवारे शाळेत तरुणाचा खुन; आरोपींने स्वत येऊन सांगितला पोलिसांना घटनाक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमलाबाई गरवारे (Vimalabai Garware) प्रशालेच्या मैदानातील खुनाला आरोपीने स्वतःच पोलिस ठाण्यात हजर होत वाचा फोडली आणि दोन दिवसापूर्वीचा खून उघडकीस आला आहे. रविवारी त्याचा खून केल्यानंतर तो दोन दिवस फिरला आणि आज नशा उतरल्यानंतर पुन्हा विमलाबाई गरवारे (Vimalabai Garware) शाळेत आला. तर मित्र तिथेच पडून दिसताच त्याने समोरच आसलेल्या डेक्कन पोलीस ठाण्यात जात मी खून केल्याची माहिती दिली. दारू पिताना वाद झाल्यानंतर खून झाला होता.

मोदी सरकारचा भाडेकरूंसाठी मोठा निर्णय ! नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच मिळणार ‘हे’ अधिकार, जाणून घ्या

राजन रमेश सहानी (वय २७, रा. वारजे नाका) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी किसन प्रकाश वरपा (वय २१, रा. श्रमिक वसात, कर्वे रस्ता) याला अटक केली आली.
याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COVID-19 and Children : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून तुमच्या मुलाला वाचवायचे असेल तर त्याच्या डाएटमध्ये करा ‘या’ 7 गोष्टींचा समावेश

राजन हा रंगकाम करतो. राजन आणि आरोपी किसन यांची तीन वर्षांपासून मैत्री आहे.
दोघांना दारू पिण्याचे व्यसन आहे.रविवारी (३० मे) दोघेजण भेटले असता दोघांनी दारू प्यायली.
दिवसभर फिरल्यानंतर ते डेक्कन परिसरात आले.

किसन गरवारे शाळेत शिकत होता. त्यामुळे त्याला शाळेच्या आवाराची माहिती होती.
दोघेजण शाळेच्या सीमाभिंतीवरून उडी मारून आत आले.
दुसऱ्या मजल्यावरील मोकळ्या जागेत पुन्हा दारू प्यायला बसले.
दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाला आणि किसन याने डोक्यात डब्बा घालून त्याचा खून केला. खुनानंतर किसन पसार झाला होता.
तर राजन बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

यादरम्यान बुधवारी किसन पुन्हा शाळेत आला. त्यावेळी राजन पडलेला दिसला. तर हालचाल करत नसल्याने त्याने समोरच डेक्कन पोलीस ठाण्यात जात या प्रकाराची माहिती दिली आणि या खुनाचा उलघडा झाला.

दरम्यान सध्या कोरोनामुळे शाळा कुलूप बंद आहेत. किसन याने स्वतः येऊन सांगितले नसते तर खुनाचा प्रकार लवकर उघड झाला नसता, असे सांगण्यात आले आहे.

नव्या नियमानुसार पुण्यात सलून, जिम बंद ! शनिवार-रविवार फक्त ‘ही’ सेवा सुरु, इतर दुकाने बंद

Nashik : खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय ?