पुण्यात भरदिवसा युवकाचा खून, ‘लफड्या’तून ‘मर्डर’ झाल्याची ‘चर्चा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ वादातून झालेल्या भांडणामध्ये युवकाचा भरदिवसा खून झाल्याची घटना दत्तवाडी परिसरातील जनता वसाहतीतील गल्ली नं. ९१ मध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

नागनाथ राजाराम कदम (३५, रा. जनता वसाहत, गल्ली नं. ९१) असे खून झालेल्याचे नाव आहे. शेजारीच राहणाऱ्या एका युवकाने त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस दलातील सुत्रांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, गाडीवर बसल्यामुळे नागनाथ कदम आणि एकाचे वाद झाले. त्यामुळे दोघांची तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये मारेकऱ्याने नागनाथच्या डोक्यात लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. त्यामध्ये रक्तभंबाळ होवुन नागनाथ गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

खून झाल्याची बातमी परिसरात सर्वत्र पसरल्यानंतर नागनाथचा खून एका लफड्यातून झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यास पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही. गाडीवर बसल्यामुळे त्याचा खून झाल्याची पोलिस सुत्रांची माहिती आहे. दत्तवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like