Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानात दारू पित असताना मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात भिंतीवर लावलेला फायर सेफ्टीचा लाल डब्बा घालून खून (murder)  केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजन (वय 35) असे खून (murder) झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजन आणि त्याचा मित्र कर्वे रस्त्यावरील गरवारे प्रशाला शाळेच्या मैदानात मध्यरात्री दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी दारू पित असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादातून राजन याच्या डोक्यात डब्बा घालून खून केला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर तपासाला सुरुवात केली आहे.

Also Read This : 

 

Healthy Eating : शिळा ‘भात-अंडी-बटाटा…’ खात असाल तर व्हा सावध, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

 

Pune : संतापजनक ! रेल्वे प्रवासादरम्यान 8 वर्षाच्या मुलीचे झोपत असताना अपहरण, बाथरूममध्ये जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; मुलीला धावत्या रेल्वेतून फेकले 

 

Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

 

Pune : निवडणुकीच्या तोंडावर स्थायी समितीतील ‘आर्थिक’ बाजार ‘गरम’ ! आक्षेप घेत रद्द केलेली 6.50 कोटी रुपयांची निविदा आठवड्याभरात फेरविचार देत मंजुर

 

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या