पुणे : विश्रांतवाडीत दगडाने ठेचून एका तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दगडाने ठेचून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. रात्री 9 च्या दरम्यान हा प्रकार समोर आला असून, अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.

विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

शांतीनगर परिसरात एका मोकळ्या जागेत तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याचे समोर आले आहे. मात्र या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Visit : Policenama.com

 

You might also like