पुण्यात केटरिंग व्यावसायिक तरुणाचा कुऱ्हाडीने खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील येरवडा परिसरात तिघांनी किरकोळ कारणावरून एका केटरिंग व्यावसायिक तरुणाची हत्या केल्याची घटना काही वेळा पूर्वी घडली. त्याच्यावर दगड आणि कुऱ्हाडीने जबर वार करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

प्रतीक हनुमंत वण्णाळे (वय 25, रा. पंचशीलनगर येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक याचा केटरिंगचा व्यावसाय आहे. दरम्यान तो सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास येथील कॉमर्स झोन मोकळ्या जागेत यातील आरोपी बसले होते. त्यावेळी प्रतीक त्या ठिकाणी गेला. त्याने यातील एकाला मारहाण केली. त्या रागातून तिघांनी दगडाने आणि कुऱ्हाडीने त्याच्यावर वार करत त्याचा खून केला, असे यातील एका आरोपीने पोलिसांना प्राथमिक माहिती देताना सांगितले आहे. मात्र पोलीस सखोल माहिती घेत आहेत.