Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Murder Suicide Case | पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्यानंतर पतीने स्वत: झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

सोमनाथ सखाराम वाघ (वय ५३, रा. आदित्य गार्डन सिटी, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर सुवर्णा सोमनाथ वाघ (वय ४२, रा. वारजे माळवाडी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. हा प्रकार खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) मागील बाजूला पिकॉक बे (Peacock Bay) परिसरात रविवारी सायंकाळी घडला.

याबाबत ताराबाई बाळासाहेब इलग (वय ६०, रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद
(गु. रजि. नं. १५/२४) दिली आहे. पोलिसांनी सुवर्णा वाघची सवत रंजना सोमनाथ वाघ व तिची मुलगी स्नेहला सोमनाथ वाघ
आणि सोमनाथ वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची विवाहित मुलगी सुवर्णा हिची सवत रंजना व तिची मुलगी स्रेहल हे जावई सोमनाथ वाघ यांना वाई सांगत असे.
ते ऐकून तो तिला शिवीगाळ करत तुला जीवंत ठेवणार नाही, असे म्हणून मारहाण करीत असे.
रंजना व स्नेहल हे तिला सारखे टोमणे मारुन ठेवलेली बाई म्हणून हिणवत होते.
सुवर्णा हिचे पती, व सवत हे नेहमी तुला आम्ही मुलांसाठी आणले आहे. तुझी मुले ठेवून तुझे माहेरी निघून जा, तुम्ही आम्हाला गरज नाही, असे बोलून मानसिक त्रास देत असत. रविवारी सकाळी सोमनाथ याने सुवर्णा हिला फिरायला
जाण्याचे बहाण्याने मोटारसायकलवरुन पिकॉक बे येथील कमळादेवी मंदिराचे पुढे नेले.
तेथे रस्त्याच्या कडेच्या झाडामध्ये नेऊन तिच्या दगडाने ठेचून खून केला.
त्यानंतर तेथेच झाडाला त्याचे पँटचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त कुंवर, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय एन शेख
व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) गुन्हा दाखल
केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय एन शेख (Sr PI YN Shaikh) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अंतरवाली सराटीत गोंधळ, फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर जरांगे निघाले मुंबईतील सागर बंगल्यावर