पुण्यात भर उन्हात पूर परिस्थिती , पाहणीसाठी आलेल्या महापौरांना घेराव 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

पुण्यात कॅनल ला भगदाड पडल्यामुळे भर उनात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जनता वसाहत परिसरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नगरसेवक आणि महापौर उशिरा पोहोचले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांपैकी काही जणांनी महापौर मुक्ता टिळक यांना घेराव घातला. तसेच संतप्त नागरिकांकडून यावेळी महापौरांना ‘चले जाव’ चा नारा देण्यात आला . आज पुण्यात आलेली ही पूरस्थिती म्हणजे केवळ पालिकेचा आणि पाटबंधारे विभागाचा अक्षम्य दुर्लक्षितपणा आहे असे मत यावेळी संतप्त नागरिकांनी व्यक्त केले .  या कालव्याच्या डागडुजी बाबत पालिकेला यापूर्वीच पत्र दिले गेले होते असेही सांगण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fdb9574e-c234-11e8-b86e-c9e2e7b1673e’]

नक्की काय घडले –

 पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर येत आहे. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

मुळा कालवा फुटला, दांडेकर पुल पाण्याखाली

दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं.

या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.

दरम्यान, डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की, त्या पाण्यात उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो.जनता वसाहतीमध्ये बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान कॅनॉलची भिंत कशाने तुटली याबाबतच्या कारणांचा आता शोध सुरु आहे. कॅनॉलपासून केबल टाकण्याचं काम सुरु होतं. त्या कामामुळे कॅनॉलच्या भिंतीला धोका होता. तसं पत्र महापालिकेला दिलं होतं, असं आता सांगण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B071GTKHRK,B0113WSN16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4adc59ba-c235-11e8-84cb-4fe104973257′]

अनेकांचे कुटुंब उधवस्त –
पाण्याचं प्रेशर इतकं होतं की घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत. अनेकांचं कौटुंबीक साहित्य उद्ध्वस्त झालं आहे. अचानक पाणी आल्याने नेमकं काय होतंय हे कळलं नाही. पाण्याची प्रवाह इतका वेगवान होता की बघे बघेपर्यंत घरं पाण्याने भरली.

मुठा कालवा हा मुठा नदीवर आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीतून या कालव्याद्वारे पाणी सोडलं जातं. या कालव्याद्वारे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातपाणी पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी या कालव्याचं पाणी वापरलं जातं.

व्हिडिओ : पुणे : मुळा कालवा फुटला, दांडेकर पुल पाण्याखाली

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d1ae648-c235-11e8-8716-2b49ff471673′]