पुणे-नगर महामार्गावर सरदवाडीजवळ भीषण अपघात, 1 ठार तर एकजण जखमी

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ)  –   पुणे-नगर महामार्गावर सरदवाडी येथे दुचाकी व कंटेनर यांचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरील एक जण मृत पावला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात लक्ष्मण भाऊसाहेब गुंजाळ ( वय 30 रा, दैठणे गुंजाळ पारनेर,नगर) हा तरुण मृत पावला असून गणेश बबन येवले ( रा: दैठणे गुंजाळ तालुका पारनेर नगर) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत किशोर रावसाहेब गुंजाळ यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात काल साडे पाच ते सहाच्या सुमारास झाला आहे.सबंधित तरुण त्याच्या एम. एच. १६.ए.क्यू. ३५०५ या दुचाकीवरुनआपल्या गावी दैठणे गुंजाळ येथे घरी जाण्यास कारेगाव येथून निघाले असता सरदवाडी येथील विठ्ठल मंदिरासमोर त्यांच्या मोटर सायकल व कंटेनर(एन.एल. ०१.ए.डी. ५२३० )यांचात अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की यात लक्ष्मण गुंजाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश येवले हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगलावे हे करीत आहे.

तर प्रत्यक्ष दर्शीने दिलेल्या माहीतीनुसार रस्ताच्या कडेला सुरु असलेल्या एका खाजगी कंपनीच्या कामामुळे कंटेनर चालकाला त्याच्या अंदाज न आल्याने अचानक पणे कंटेनर थांबविण्यात आला आणि हा अपघात झाला.रस्ताच्या कडेला सुरू असलेल्या खोदकामामुळे आतापर्यंत अनेक अपघात देखील झाले आहे.याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की खोदकाम करणारा कडून वेळोवेळी चुकीचे काम झाल्याबाबत दंड भरून घेतला. माञ नुसता अशा दंड भरुन किती लोकांचे जीव घेणार अशा संतप्त सवाल शिवसेनेचे पोपट शेलार यांनी केला आहे.आज यामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे.तर असे चुकीचे काम करणारा लोकांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोपट शेलार यांनी सांगितले .