Pune Nagar Road Accident News | पुण्यात पुन्हा भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला फरफटत नेलं; दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Nagar Road Accident News | कल्याणी नगर येथील अपघाताची (Kalyani Nagar Accident) घटना ताजी असतानाच पुणे-नगर रोडवर सोमवारी (दि.27) रात्री साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खराडी जकात नाका (Kharadi Jakat Naka) येथे भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले दोन्ही महाविद्यालयीन युवक मुळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली (Wagholi) येथे शिक्षण घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(Pune Nagar Road Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करणारा ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी खराडीतील जकात नाका चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. शामबाबू रामफळ गौतम असे ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर मृतांपैकी एकाचे नाव आदिल शेख असून इतर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

जकात नाक्यावर सिग्नलला दुचाकी थांबवली होती. त्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिल.
दुचाकीवर असलेले तिघेही या ट्रक सोबत फरफटत गेले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी
झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत, तोपर्यंत मनुस्मृती शाळांमध्ये शिकवू देणार नाही, छगन भुजबळ आक्रमक

Ajit Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार प्रकरणात CP ना फोन केला? अंजली दमानियांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या!

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तडीपार केल्याच्या रागातून तरुणाला सिमेंटच्या गट्टू ने मारहाण, एकाला अटक