Uncategorized

Pune Nana Peth Fire | नाना पेठेतील गोदामाला भीषण आग ! फायबरचा कारखाना, स्पेअर्स पार्ट, स्पंज, लाकडी सामानाचे गोदाम जळून खाक; अग्निशामक दलाच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 जखमी (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Nana Peth Fire | नाना पेठेतील न्यू क्वार्टर गेट चौक (New Quarter Gate) परिसरात गोदामाला (Godown) भीषण आग (Pune Nana Peth Fire) लागून त्यात बाजूची दुकाने, कारखाना जळून खाक झाला. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याला ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत स्पेअर्स पार्टचे दुकान (Spare Part Shop), फायबरचा कारखाना, स्पंज, लाकडी सामानाचे गोदाम जळून खाक झाले आहे. मध्यरात्री सव्वा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत अग्निशामक दलाचे (Pune Fire Brigade) अधिकारी प्रभाकर उमराटकर, फायरमन सुधीर नवले यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.

 

 

 

 

नाना पेठेतील आंबेडकर कॉलेज शेजारी कावेरी सोसायटी आहे. या सोसायटीला लागून गल्लीत अनेक दुकाने, गोदाम आहेत. त्यातील एका गोदामाला रात्री साडेअकरा वाजता भीषण आग (Pune Nana Peth Fire) लागली. अग्निशामक दलाला याची खबर शुक्रवारी रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर १० अग्निशामक दलाचे गाड्या, ३ वॉटर टँकर, ३ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. येथे सुमारे ४ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम असून त्याच्या पुढे ३ दुकाने आहेत. या दुकानात गादीचा कारखाना, लाकडी फर्निचर, दुचाकी, चारचाकीच्या स्पेअर्स पार्ट तसेच गाड्यांसाठी लागणार्‍या फायबरच्या पार्ट बनविणारा कारखाना आहे. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री १ वाजल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत संपूर्ण दुकाने, कारखाना जळून खाक झाला आहे.

 

 

या आगीत एकाच्या पायाला भाजले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून अजून कुलिंगचे काम बराच वेळ चालणार असल्याचे अग्निशामक दलाचे प्रमुख सुनिल गिलबिले (Fire Brigade Officer Sunil Gilbile) यांनी सांगितले.
या दुर्घटनेच्या बाजूलाच राजेवाडी झोपडपट्टी येथे मांगीरबाब उत्सव सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते काम करत जागे होते. या कार्यकर्त्यांनी गाड्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

 

अग्निशमन दलाचे अधिकारी जखमी

आग विझविण्याचे काम करीत असताना अंधार असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी प्रभाकर उमरटकर (Officer Prabhakar Umratkar) यांच्या पायाला कापल्याने ते जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले़ फायरमन सुधीर नवले यांच्या पायाला मुका मार लागला.
आगीच्या घटनेत एका व्यक्तीचे हात व पाय भाजले असून दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

 

Web Title :- Pune Nana Peth Fire | Terrible fire at Nana Pethe’s godown ! Fiber factory, spare parts, sponges, wooden godown burnt down; 4 injured, including 2 firefighters

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button