Pune Narhe Crime | ‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

Pimpri Chinchwad Crime News | Pimpri: A stone was thrown on the head of a young man after asking him for tearing down a banner, a crime against 6 persons; One arrested

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Narhe Crime | आम्ही येथील भाई आहोत असे म्हणत तीन ते चार जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन चाकी आणि चारचाक गाड्यांची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच हातातील रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार नऱ्हे येथील सिंहगड कॉलेज समोरील सार्वजनिक रोडवर बुधवारी (दि.21) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत नाना बाबासो भुसे (वय-32 रा. वैष्णवी भवन, नरवसकर वस्ती, सिंहगड कॉलेज जवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तीन ते चार जणांवर आयपीसी 427, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची चारचाकी गाडी (एमएच 12 व्हीएफ 7834) रस्त्याच्या बाजुला पार्क केली होती. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जण दोन दुचाकीवरुन आले. त्यांनी जोर जोरात आरडा ओरडा करुन हाताली लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या गाडीची पाठीमागील काच फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्या गाडीजवळ पार्क केलेली वैगनआर, स्विफ्ट, टेम्पो, दोन रिक्षांच्या काचा फोडून नुकसान केले.

वाहनांची तोडफोड केल्यानंतर, एका एकाला जीवंत सोडणार नाही असे म्हणून त्यांच्या हातातील लोखंडी रॉड हवेत
फिरवत कोणी आमच्या नादाला लागु नका, आम्ही येथील भाई आहोत, असे म्हणून हातातील रॉड हवेत फिरवून
दहशत पसरवुन शिवीगाळ करत दुचाकीवरुन पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी

Pune Kondhwa Crime | रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचे तोंड दाबून गैरवर्तन, आरोपीला अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Pune News | साहित्य परिषदेचा चालता बोलता इतिहास हरपला ! कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे निधन

Total
0
Shares
Related Posts

Pune Crime News | फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने बालमैत्रिणीने बोलविले घरी ! मारहाण करुन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद