Pune-Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Nashik High Speed Railway | महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra State Government) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik High Speed Railway) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या (Central Government) निती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railways) मंजूरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रकल्पासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या 20 टक्के रक्कम केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

गुरूवारी रेल्वे मंत्रालयाने पुन्हा बैठक घेतली होती. यामध्ये रेल्वे कार्पोरेशनचे संचालक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik High Speed Railway) महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निती आयोग आणि रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

 

दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रेल कार्पोरेशनच्या (Maharashtra State Railway Corporation) वतीने हाती घेतला आहे.
रेल्वे पुणे – नाशिक शहरांसह पुणे (Pune), अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक (Nashik) या 3 जिल्ह्यांतून जाणार आहे.
तसेच या तीन जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 470 हेक्‍टर जमीन संपादित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 16 हजार कोटी रुपये खर्च लागणार असून आता या प्रकल्पास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे.

 

Web Title :- Pune-Nashik High Speed Railway | green signal for pune nashik high speed railway pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा