Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण; 36 गुंठ्यांना मिळाले 1 कोटी 72 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Nashik High Speed Railway | पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा पुणे-नाशिक रेल्वे (Pune Nashik High Speed Railway) प्रकल्प नवीन वर्षात सुसाट वेगाने धावणार असल्याचे स्पष्ट झाले. एका वर्षाच्या आत जमिनीची मोजणी करुन खरेदी खत देखील सुरु करत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) व भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे (Rohini Akhade) यांनी विकास प्रकल्पांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पेरणे गावातील चंद्रकांत गंगाराम कोलते (Chandrakant Gangaram Kolte) यांना रेडीरेकनरच्या (Redireckner) तब्बल 5 पट मोबदला देऊन शुक्रवारी (दि.7) पहिले खरेदी खत करण्यात आले.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे (Pune Nashik High Speed Railway) मार्गासाठी पुणे जिल्ह्यातील (Pune District) 51 गावांमधील जमीन घेण्यात येणार आहे.
यासाठी 8 महिन्यांत जागेची मोजणी पूर्ण करण्यात आली.
यासाठी जमिनीचे दर निश्चितीची किचकट प्रकिया एक ते दीड महिन्यात पूर्ण करण्यात आली.
पुणे-नाशिक रेल्वेसाठी जमिन संपादनासाठी रेडीरेकरनच्या पाच पट व जमिनीवर असलेल्या बांधकाम, सिंचन योजना, झाडे, फळबागासाठी एकूण मूल्याच्या अडीच पट मोबदला देण्यात येणार आहे.

पुणे-नाशिक केवळ दोन तास प्रवास

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी हा रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
एवढेच नाही तर पुणे-नाशिक हे अंतर केवळ दोन तासांवर येणार आहे.
या रेल्वे प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली (Haveli Taluka), खेड (Khed Taluka), आंबेगाव (Ambegaon Taluka) आणि जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) 51 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे.
बहुतांश सर्व गावातील जमिन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

जागेची मोजणी वेळेत पूर्ण

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे विभाग (Central Railway Department) प्रचंड आग्रही आहे.
यासाठी केंद्रीय रेल्वे विभागाने महसूल विभागाला (Revenue Department) डेडलाईन घालून दिली आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रिंगरोड (Ringroad) व या रेल्वे प्रकल्पासाठी प्रचंड आग्रही असून, दर महिन्याला दोन्ही प्रकल्पांच्या कामांचा आढावा ते घेतात.
ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी जागेची मोजणी वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा राबवून वेळेत जमिन मोजणीचे काम पूर्ण केले.

रेल्वे प्रकल्पाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.
(Maharashtra Rail Infrastructure Development Corporation Ltd.)मार्फत या रेल्वे मार्गाचे बांधकाम होणार आहे.
पुणे, अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यात मिळून एकूण 54 गावांचा यात समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे.
प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार असून,
राजगुरूनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे.

Web Title :-  Pune Nashik High Speed Railway | pune nashik high speed railway line 36 guntas got 1 crore 72 lakhs money pune news

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

DA Hike-DR Hike | 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचे चित्र स्पष्ट, जाणून घ्या 20 हजार बेसिकवर किती होईल फायदा

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे उघडा अकाऊंट, दर महिना मिळेल 2500 रुपयांची उत्पन्न; जाणून घ्या

 

Aadhaar-PAN Card Center on Railways Station | रेल्वे स्टेशनवर सुद्धा बनवू शकता Aadhaar आणि PAN Card, सुरू झाली ‘ही’ सर्व्हिस