Pune Nashik Highway Accident | पुणे – नाशिक मार्गावर भीषण अपघात, 10 मेंढ्या जागीच ठार

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Nashik Highway Accident | पुणे – नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway Accident) डोळासणे गावाच्या परिसरात पिकअप व ट्रकची (Truck) जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. पिकअप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यामध्ये १० मेंढ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

याबाबत अहमदनगर पोलिसांनी (Ahmednagar Police) दिलेल्या माहितीनुसार अपघात झालेल्या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा होत्या व तो ट्रक संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने चालला होता.
शनिवारी पहाटे डोळासणे (Dolasane) गावच्या हद्दीमध्ये असताना नाशिक (Nashik) येथील मनमाड
(Manmad) जिल्हातील मेंढ्या घेऊन जाणाऱ्या पिकअपची (Pick- Up) जोरदार धडक झाली.
पिकअप चालक समीर शेखचे (Sameer Shaikh) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरील विटांच्या ट्रकला
त्याने पाठीमागून जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात पिकअपमधील १० मेंढ्या जागेवरच चेंगरुन ठार झाल्या असून पिकअपच्या पुढील
भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात पिकअप चालक समिर शेख
आणि रामा हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.

Web Title :  Pune Nashik Highway Accident | Terrible accident on Pune-Nashik route, 10 sheep killed on the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?, अजित पवार म्हणाले- ‘ बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक …’ (व्हिडिओ)

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Pune News | हौशी बैलगाडा मालकाने घोडीला आणले महागड्या फॉर्च्युनर कारमधून; व्हिडीओ तुफान व्हायरल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप