Pune Nashik Semi High Speed Railway | महारेलने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पातील स्थानकांसाठी इच्छुक कंपन्यांकडून मागवले EOI

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Nashik Semi High Speed Railway | पुणे-नाशिक या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांपर्यंत कमी करणाऱ्या महत्त्वकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune Nashik Semi High Speed Railway) प्रकल्पाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) वित्त आयोगाने (Finance Commission) मंजुरी दिल्यानंतर ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ने (महारेल) (Maharashtra Railway Infrastructure Development Corporation) या प्रकल्पातील रेल्वे स्थानकांसाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (EOI) मागवले आहे.

 

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune Nashik Semi High Speed Railway) प्रकल्पासाठी पुणे, नगर आणि नाशिक या तिन जिल्ह्यामध्ये सध्या भूसंपादनाची प्रक्रिया (Land Acquisition Process) सुरु आहे. केंद्राकडून अंतिम मान्याता मिळणे बाकी असले तरी या मार्गासाठी पुढील टप्प्यातील तयारी महारेल ने सुरु केली आहे. त्याअंतर्गत या मार्गावरील सर्व स्टेशन बांधकाम (Station Construction), त्या लगतचा परिसर, पादचारी पूल आणि इतर सर्व कामांसाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव (Proposal) मागवण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) स्टेशन बांधकाम नियमांनुसार महारेकडून आराखडा/रचनेनुसार या स्टेशनच्या बांधकामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये पुणे स्टेशन (Pune station) ते हडपसर (Hadapsar) दरम्यानचा मार्ग पूर्णत: उन्नत स्वरुपाचा असल्याने या दोन्ही स्टेशनच्या रचनेवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. प्रस्ताव पाठवण्यासाठी एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

1458 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार
या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) मार्च 2021 मध्ये मान्यता दिली होती. रेल्वे बोर्डानेही (Railway Board) गेल्या वर्षी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. या प्रकल्पासाठी एकूण 16 हजार 39 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी पुणे, नगर, नाशिक या तिन जिल्ह्यातील 1458 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे.

ही चार स्थानके वगळली
या मार्गावर सुरुवातीला 24 स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, पाहणी आणि मार्गाची आखणी पूर्ण झाल्यानंतर 4 स्थानके वगळण्यात आली आहे. आता या मार्गावर 20 स्थानके असणार आहेत. पुण्यातील कोलवडी, नगरमधील जांबुत, देवठाण आणि नाशिकमधील दोडी ही चार स्थानके वगळण्यात आली आहेत.

 

प्रकल्पातील स्थानके
पुणे (टर्मिनल), हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंबोरे, संगमनेर, निमोण, नांदुर-शिंगोटे, सिन्नर,मुढारी, वडगाव पिंगळा, नाशिक (टर्मिनल)

 

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

– 235 किलोमीटर प्रकल्पाचे अंतर

– 200 किमी/प्रति तास रेल्वेचा अपेक्षित वेग

– 1 तास 45 मिनिटे पुणे-नाशिक दरम्यान प्रवासाचा कालावधी

– 18 लहान-मोठे बोगदे

– 20 प्रस्तावित स्थानके

– 85 मोजणी झालेली गावे

या प्रकल्पाबाबत खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) म्हणाले, पुणे-नाशिक रेल्वेसाठी बहुतांश परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
फक्त आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) मान्यतेची प्रतीक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर उमटल्यावर काम गतीने व्हावे,
यासाठी स्टेशनच्या बंधकामाचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच या प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

 

Web Title :- Pune Nashik Semi High Speed Railway | land acquisition begins for pune nashik semi high speed railway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Rajesh Pandey | भाजप निवडणूक प्रमुखपदी राजेश पांडे यांची नियुक्ती

 

Gold-Silver Rates Today | …म्हणून सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किंमतीत तब्बल 3 हजार रूपयांची घसरण

 

Mrunal Thakur Video | ट्रोलर्सची नजर खिळली मृणाल ठाकुरच्या कंबरेवर, मृणालनं दिल ट्रोलर्सना सडेतोड उत्तर..