Pune : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली कोवॅक्सिन लस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जुन्या भोसरी येथील रुग्णालयात कोवॅक्सिन लस घेतली. त्यावेळी भोसरी हॉस्पिटलच्या अधिष्ठाती डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राहुल कलाटे उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आज ६७ वा वाढदिवस. राज्यात लॉकडाऊन असल्याने कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन तोडून शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. कार्यकर्त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या परिसरातच बाळासाहेबांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा केला. आज त्यांनी पिंपरी चिंचवड येथिल भोसरी रुग्णालयात जाऊन कोवॅक्सिन लस घेतली.