राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची पुण्यात गळफास घेवुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशी याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. पुण्याच्या या गुणवचान राष्ट्रीय जलतरणपटूने आत्महत्या केल्याने संपुर्ण क्रिडा विश्‍वात खळबळ उडाली आहे. वेळावेळी फोन केल्यानंतर देखील मुलगा प्रतिसाद देत नसल्याने साहिलचे वडिल कार्यालयातून घरी गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, साहिलच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकलेले नाही.

साहिल हा एकुलता एक असून तो सध्या एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षात शिकत होता. आत्‍तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर उत्‍तम कामगिरी करणार्‍या साहिलने आतापर्यंत 7 सुवर्णपदके जिंकली होती. राज्य पातळवरील तर तो नेहमीच पदक मिळतवत होता. साहिलने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजु शकलेले नाहीत. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण काय आहे याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, साहिलच्या आत्महत्येने महाराष्ट्रानेच नव्हे तर भारताने एक चांगला जलतरणपटू गमावला आहे. अत्यंत मनमिळावु स्वभावाच्या साहिलच्या आत्महत्येने त्याच्या कुटूंबासह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.