पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Navale Bridge Accident | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर (Mumbai-Bangalore Bypass) नवले पूल परिसरात झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्यापैकी पत्नी जागीच ठार झाली असून पती जखमी झाला आहे. (Pune Navale Bridge Accident)
मृत महिलेचे नाव ज्योत्स्ना सूर्यकांत वाघुले (वय ४०, रा.दिघी) असे आहे. तर या अपघातात मृत महिलेचे पती सूर्यकांत वाघुले (वय ४६) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरूध्द गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मृत महिलेचे पती सूर्यकांत वाघुले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) दिली.
दुचाकीवरील वाघुले दांपत्य मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून निघाले होते.
यावेळी वडगाव उड्डाणपुलाजवळ (Vadgaon Flyover) आले असता भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्योत्स्ना यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.
तर त्यांचे पती सूर्यकांत हे जखमी झाले होते.
सूर्यकांत वाघुले यांनी या अपघाताची फिर्याद सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर
आता पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.
Web Title :- Pune Navale Bridge Accident | a female passenger on a two wheeler died after being hit by a truck near navale bridge in pune crime accident news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update