Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ अपघात ! मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune Bangalore Highway) नवले ब्रिज परिसरात वारंवार अपघात होत आहेत. नवले ब्रिज परिसरात पुन्हा एक अपघात झाला असून या अपघातात एका पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कात्रज बाह्यवळण मार्गावर झाला असून भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची धडक या महिलेला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला. (Pune Navale Bridge Accident)

ललिता विजय बोरा (वय-65 रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या पादचारी ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक अनिरुद्ध खैरनार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Navale Bridge Accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता बोरा या कात्रज चौक ते नवले पूल (Katraj Chowk To Navale Bridge)
दरम्यान असलेल्या बाह्यवळण मार्गावरुन जात होत्या. आंबेगाव बुद्रुक परिसरात त्या रस्ता ओलांडत होत्या.
त्यावेळी मोटार चालक खैरनार हा भरधाव वेगात आला. त्याच्या मोटारीची धडक बोरा यांना बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन बोरा यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख (PSI Mohan Deshmukh) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Thackeray | ‘तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर, नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारवर टीकास्त्र

Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

03 October Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांना होणार धनलाभ, वाचा दैनिक भविष्य