Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, तीन ट्रक एकमेकांना धडकले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई-बंगळुरु महामार्गावर (Mumbai-Bangalore highway) नऱ्हे येथील नवले ब्रिजवर (Pune Navale Bridge Accident) अपघाताची मालिका सुरुच आहे. नवले पुलाजवळ तीन मालवाहतूक करणारे तीन ट्रक एकमेकांना धडकून अपघात (Pune Navale Bridge Accident) झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवित हानी झाली नाही. परंतु अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरु-मुंबई महामार्गावर दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
तीन मालवाहतूक करणारे तीन ट्रक एकमेकांना धडकल्याने (three truck hit) हा अपघात झाला असून यामध्ये तिन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police Station), सिंहगड वाहतूक विभाग
(Sinhagad Road Traffic Police), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (National Highways Authority of India) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

दरम्यान, आजपर्यत नवले ब्रिज परिसरात अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) पत्रव्यवहार करुन उपाययोजना करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मात्र अद्याप या मार्गावर अपघात रोखण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही.

 

Web Title :  accident near navale bridge in pune three truck hit sinhagad road police on the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | सैन्य दलाच्या वर्दीचा वापर करुन तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुणे पोलिसांनी अहमदनगर येथून ‘लखोबा लोखंडे’च्या आवळल्या मुसक्या

Mutual funds | अवघ्या 10,000 रुपयांची मंथली SIP बनवू शकते तुम्हाला करोडपती, जाणून घ्या सविस्तर

8 राज्यांमध्ये आकाशातून होणार संकटाचा वर्षाव! IMD ने 1 डिसेंबरपर्यंत दिला जोरदार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रा संदर्भातील पावसाचा अंदाज