Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident |कात्रज बोगद्यातून नवले ब्रिजकडे येताना भरधाव टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. टेम्पोने तबल 8 वाहनांना उडविले आहे. वाहनांचा चक्काचुर झाला आहे. सकाळी साडे सातच्या दरम्यान हा अपघात झाला. pune navale bridge accident accident of truck on navale bridge

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

विद्याधर शंकर साळुंके (वय 68, रा. प्लॉट न ८२ अध्यापक कॉलनी सहकारनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अमजद खान (वय 45) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. टेम्पो चालक पसार झाला आहे. टेम्पोचा क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो (क्रमांक- DD. 01. C. 9467) हा दिऊदमनचा आहे. सुरुत येथून भाजीपाला घेऊन टेम्पो मुंबईत जात होता. कात्रज बोगद्यातून नवले ब्रिजच्या दिशेने मुंबईकडे जात असताना अचानक उतारावर हॉटेल विश्वाससमोर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पोने समोरील 3 रिक्षा व 4 कारला उडविले. यात काही रिक्षा आणि कार पार्क केलेल्या होत्या. यात साळूखे यांच्या कारला जोराची धडक बसली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. तर खान हे देखील त्यांच्या कारने जात असताना त्यांना उडविले आहे. यात त्यांच्या कारचा चुराडा झाला आहे. खान हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

साळुंखे हे स्कुल व्हॅन चालक आहेत. सहकारनगर येथे ते राहतात. सकाळी ते मित्रांना भेटण्यासाठी कार घेऊन निघाले होते. त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

चहामुळे मोठा अनर्थ टळला…

अपघातात 8 वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण, सुदैवाने अपघातावेळी रिक्षा चालक व काही कार चालक हे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यांनी कार व रिक्षा रस्त्याच्या कडेला लावल्या आणि चहा पिण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये गेले. त्याचवेळी हा अपघात झाला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. टेम्पो चालक अपघात झाल्यानंतर काहीवेळ तेथे उभा होता. पण, गर्दीतून वाढू लागल्यानंतर तो पसार झाला आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : pune navale bridge accident accident of truck on navale bridge

 

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान