Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रीजवर सलग तिसऱ्या दिवशी अपघात ! ट्रकने 8 वाहनांना धडक दिल्याने दोन महिला जखमी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई-बंगळुरु महामार्गावर (Mumbai-Bangalore highway) नऱ्हे येथील नवले पुल (Pune Navale Bridge Accident) परिसरात अपघात होण्याची मालिका सुरुच आहे. सलग तिसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात 8 वाहनांचे नुकसान झाले आहे. नवले ब्रीज परिसरात आज झालेल्या अपघातात (Pune Navale Bridge Accident) दोन महिला जखमी झाल्या आहे. हा अपघात आज (शनिवार) दुपारी साडे बाराच्या सुमारास झाला.

 

नवले ब्रीज परिसरात सलग तिसऱ्या दिवशी अपघात झाला आहे. गुरुवारी झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. शुक्रवारी रात्री त्याच ठिकाणी झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू (Death) झाला होता. तर 13 जण जखमी झाले होते. शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एका थिनर घेऊन निघालेल्या टँकरने 17 सीटर ट्रॅव्हलर (17-seater traveler) जोराची धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी होऊन सर्व्हिस रोडवर पडली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये (Selfie Point ) बसलेले काही नागरीक जखमी झाले.

 

शनिवारी सेल्फी पॉइंटजवळ पुन्हा अपघात झाला आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात 8 वाहनांचे नुकसान झाले आहे.
या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

दरम्यान, यासंदर्भात सिंहगड रोड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता पोलिसांनी सांगितले की, होय नवले ब्रिजवर काही वेळापुर्वी अपघात झाला आहे.
सध्या मार्शल तिकडे रवाना करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

 

डिझेल वाचवण्यासाठी ड्रायव्हर करतात ही घोडचूक अन्…

 

उतारावरून येत असताना बहुसंख्य ड्रायव्हर वाहन न्यूट्रलवर ठेवतात. उतार असल्याने वाहनाचा वेग वाढतो.
त्यामुळे चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटते. ब्रेक लागत नाही आणि अपघात होतो असे यापुर्वी अनेकवेळा घडले आहेत.
त्यामुळेच सध्या निवले ब्रिजवरील अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

Web Title : Pune Navale Bridge Accident | Accident on Navale Bridge in Pune for third day in a row! Two women were injured when the truck hit 3 vehicles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक (व्हिडिओ)

PhonePe द्वारे मोबाइल रिचार्ज करणे पडणारा महागात, UPI पेमेंटवर सुरू केली प्रोसेसिंग शुल्क ‘वसूली’; जाणून घ्या

Mumbai Cruise Drugs Case | ‘ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही’; चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेला समीर वानखेडेंनी सुनावलं

Life Certificate | पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’; जाणून घ्या शेवटची तारीख आणि प्रोसेस?