×
Homeताज्या बातम्याPune – Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात, भरधाव...

Pune – Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात, भरधाव वेगातील कंटेनर दुभाजकावर आदळला; दोन वाहनांचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले ब्रिजवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात (Pune – Navale Bridge Accident) एका ट्रकने तब्बल 48 वाहनांना धडक दिली. ही घटना ताजी असतानाच त्याच रात्री पुन्हा अपघात झाला. त्यामुळे नवले ब्रिज अपघातांचे केंद्र बनले आहे. आज (मंगळवार) दुपारी पुन्हा किरकोळ अपघात (Pune – Navale Bridge Accident) झाला आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. यामध्ये दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.

 

अपघात ग्रस्त कंटेनर कात्रज कडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्ता दुभाजकाला धडकला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले. क्रेनच्या सहायाने ट्रक तसेच वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बाह्यवळण मार्गावर नवले ब्रिज परिसरात (Navale Bridge Accident) रविवारी रात्री वेगवेगळे दोन अपघात झाले. ट्रकने 48 वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. या अपघाताची सर्वत्र चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या अपघाताची दखल घेत अपघात नक्की कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे निर्देश दिले.

रविवारी नवले ब्रिजवर झालेल्या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीत अपघात रोखण्यासाठी दीर्घ कालीन आणि अल्पकालीन उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली.

 

Web Title :- Pune – Navale Bridge Accident | Again Accident At Navale Bridge Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत

Must Read
Related News