Pune – Navale Bridge Accident | नवले पुलावरील अपघात थांबेनात; पुन्हा 2 अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले पूल (Pune – Navale Bridge Accident) अपघातासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी उतार आणि वाहतूक कोंडी असल्याने सतत अपघात होत असतात. रविवारी (दि. 20) या पुलावर टँकरचा मोठा अपघात झाला होता. त्या अपघाताला चोवीस तास उलटत नाहीत, तोपर्यंत पुन्हा दोन अपघात नवले पुलावर (Pune – Navale Bridge Accident) घडले आहेत.

मुंबई-बंगळुरू (Mumbai Bangalore Highway) बाह्यवळण मार्गावर रविवारी भरधाव टँकरने 24 वाहनांना धडक दिली होती. सोमवारी पुन्हा या बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ (Swaminarayan Temple Katraj Pune) मध्यरात्री टेम्पोने 7 वाहनांना धडक दिली. तर अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नवले पुलावर (Pune – Navale Bridge Accident) घडली आहे. रविवारच्या अपघातात 24 गाड्यांचे नुकसान झाले होते. तसेच 12 ते 14 जण या अपघातात जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा झालेल्या अपघातात एका दुचारीस्वाराला जीव गमवावा लागला असल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या पुलाला भेट दिली आहे.
यावेळी सुळे म्हणाल्या, नवले पुलावर सततच्या अपघातावर आणि वाहतूक कोंडीवर 2021 साली मी लोकसभेत प्रश्न मांडला होता.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
तसेच मी एनएचएआई (NHAI) ला विनंती करते की, तज्ज्ञांना सल्ला घेऊन या ठिकाणी असलेल्या उताराची
उंची कमी करता येईल का, ते पाहावे. या ठिकाणी सतत अपघात होत असतात.
पण आता आधीपेक्षा अपघात कमी झाले आहेत. पण, आपल्याला शून्य अपघातावर परिस्थिती आणता आली पाहिजे.
गाडीच्या वेगामुळे जास्त अपघात होतात.
सर्विस रोड, चांगल्या दर्जाचे फुटपाथ आणि रोड सेफ्टीमध्ये नागरिकांना जागरूक केले पाहिजे.

Web Title :- Pune – Navale Bridge Accident | bike rider dies in two accidents in navale bridge area seven people were injured pune crime news