Pune Navale Bridge Accident | अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात हालचालींना वेग, कृती आराखड्याद्वारे दीर्घ कालीन आणि अल्पकालीन उपाययोजना राबवण्यावर बैठकीत चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | पुणे-बंगळुरु महामार्गावर वडगाव येथील नवले पुलावर आजपर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रविवारी रात्री भीषण अपघात झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कात्रज घाटातून उतरताना तीव्र उतारामुळे अपघाताला (Pune Navale Bridge Accident) निमंत्रण मिळत असल्याने यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अपघात रोखण्यासाठी दीर्घ कालीन आणि अल्पकालीन उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांच्यासोबतच महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ.कुणाल खेमनार (Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar), महापालिकेचे वाहतूक शाखेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्गचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुरगामी उपायोजना करण्याची गरज
बैठकीनंतर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकारांना देताना म्हणाले, नागरिकांचे जीव महत्त्वाचे आहेत. मागील सहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे अपघाताचे (Pune Navale Bridge Accident) प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी दुरगामी उपाययोजना करण्याची गरज आहे. सध्या रस्ते अपघात रोखण्यासाठी जे आवश्यक आहे त्याची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलीस, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अपघाताची कारणे शोधून काढील आहेत.याशिवाय अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, हे देखील त्यांनी सांगितले. त्यानुसार आराखडा तयार केला जाणार असून पुन्हा दोन दिवसांनी आम्ही त्याठिकाणी जाऊन पाहणी करणार असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

रविवारचा अपघात चालकाच्या चुमकीमुळे
रविवारी नवले पुलावर झालेला अपघातील ट्रकचालक पसार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत खरे कारण समोर येणार आहे. मात्र काही प्रत्यक्षदर्शींनी उतारावर ट्रक बंद करण्यात आल्याने वेगामुळे त्याचे ब्रेक लागले नाहीत. ट्रकच्या पढे आणी मार्गात असलेल्या गर्दीमुळे वाहनांचा वेग कमी झाला होता. हा ट्रक त्या वाहनांना जाऊ धडकला आणि थांबला. केवळ डिझेल वाचवण्यासाठी चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

 

सर्व्हिस रोडवरील अतीक्रमणे काढली
कात्रज बोगद्यापासून वडगाव येथील पुलापर्यंत तीव्र उतार आहे. यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी ठेवण्यासाठी रस्त्यावर अधिक जाडीच्या रम्बलर्स स्ट्रीप मधील अंतर कमी करुन या रम्बलर्स स्ट्रीप सुस्थितीत राहतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय सर्व्हिस रोडवर असलेले अतिक्रमणेही काढण्यात आहेत. ही अतिक्रमणे पुन्हा होऊन नयेत यासाठी पुढील काळात कडक कारवाई केली जाणार आहे.

तसेच अनधिकृत वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. याशिवाय एसटी व बससाठी सुरक्षित थांबे करण्यासंदर्भात चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने येथील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी तातडीने कामे हाती घ्यावीत, असे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

 

उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत.

1) मुख्य उतार कमी करणेबाबत उपाययोजना करणे, तसेच स्वामी नारायण मंदिर ते दरीपुल मधील तिव्र वळण कमी करणे

2) विविध ठिकाणी रम्बलर स्ट्रीप्स व रिफलेक्टर बसविणे

3) जड वाहनांचे स्पीड लिमीट टप्याटप्याने कमी करणे

4) सर्व्हिस रस्ता रुंद करणे,दुरुस्ती करणे, तेथील अतिक्रमणे काढणे

5) नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत विविध ठिकाणी वाहनांचा वेग कमी
करण्यासंदर्भात अनाऊसमेंट करण्यासाठी ऑडीओ सिस्टिम बसविणे.

6) जड वाहणांची वेगमर्यादा 40 करणे.

7) रम्बलर स्ट्रीप दर 300 ते 400 मीटरच्या अंतरावर करणे, तसेच प्रत्येक दोन महिन्यांनी त्याची देखभाल व दुरूस्ती करणे

8) स्पिड गण व कॅमेरे बोगद्यापासून थोड्या-थोड्या अंतरावर दोन ते तीन ठिकाणी बसविणे.

9) नर्‍हे सर्व्हिस रोड व महामार्गाला मिळणार्‍या सर्व छोट्या रस्तयावर रम्बलर स्ट्रीप बसविणे.

10) स्ट्रिट लाईट संख्या वाढविणे

11) नागरिक महामार्गावर येणार नाहीत, त्या दृष्टीने नर्‍हे सेल्फी पाईंट हटवून तेथील पायर्‍या तोडने

12) पुल सुरू होताना व पुलावर विविध ठिकाणी ब्लिंकर बसविणे

13) महामार्गावर लावण्यात आलेले विविध प्रकारचे साईन बोर्ड हे रस्त्याच्या डाव्या बाजूला असून, ते वाहनचालकांना स्पष्ट दिसावेत यासाठी ते रस्त्याच्या मधोमध दर्शनी भागात लावणे.

तातडीच्या उपायोनांवर भर – पोलीस आयुक्त
अपघाताच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पहाणी करण्यात आली.
उपाययोजना करुनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने र्दीर्घ कालीन व तातडीने करण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
मागील सहा महिन्यात येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले होते.
मात्र आता पुन्हा अपघातांचे सत्र सुरु झाल्याने सर्व यंत्रणांशी समन्वय साधून तातडीच्या काही उपायोनांवर भर
देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले.

 

Web Title :- Pune Navale Bridge Accident | Discussion in the meeting on implementation of long term and short term measures through action plan, speed of movement in police commissionerate to prevent accidents

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना