Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर ‘अब तक 56’ ! ‘या’ कारणामुळं ‘सेल्फी पॉईंट’जवळ अपघात होत असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्टचं सांगितलं (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई-बगळुरू महामार्गावर (Mumbai-Bangalore highway) असलेल्या नवले पुलाजवळ मागील तीन दिवसांपासून अपघात (Pune Navale Bridge Accident) होत आहेत. तीन दिवसांत झालेल्या अपघातात 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 15 ते 16 जण जखमी झाले आहेत. नऱ्हे गाव परिसरातील सेल्फी पॉईंटजवळ हे अपघात झाले आहेत. पोलिसांकडून या ठिकाणी उपाय योजना करण्यासाठी शासन दरबारी पत्र व्यवहार केला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने नवले पुलावरच्या अपघातांना (Pune Navale Bridge Accident) कधी ब्रेक लागणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

 

अब तक 56…

 

पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीतील नवले ब्रिज आणि परिसरात सन 2014 पासून आतापर्यंत तब्बल 46 प्राणांतिक अपघात (Pune Navale Bridge Accident) झाले आहेत.
त्यामध्ये तब्बल 56 हून अधिक लोकांना प्राण मगवावे लागले आहेत. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) पत्रव्यवहार करुन उपाययोजना करण्याबाबत सांगितल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

NHAI च्या अधिकाऱ्यांचा निष्क्रीय कारभार

 

नवले ब्रीज परिसरात सलग तीन दिवस झालेल्या अपघातामुळे नागरिकांचे भीतीचे वातावरण असून हे अपघात NHAI च्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रीय कारभारामुळे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पुलावर कॅमेरा (Camera), स्पिडगन या फॅसिलिटी (facility) अद्याप उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत.
अद्याप बोगद्यापासून नवले ब्रीजपर्यंत एकही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही.
अधिकाऱ्यांच्या शून्य कारभारामुळे निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक (Pune Navale Bridge Accident) करीत आहेत.

 

…म्हणून गुरुवारचा अपघात झाला

 

सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (Senior Police Inspector Devidas Gheware) यांनी पोलीसनामासोबत बोलताना सांगितले की,
नवले ब्रीज परिसरात नऱ्हे येथे सेल्फी पॉईंट (Selfie point) आहे. या पॉईटजवळ नागरिक उभे राहून सेल्फी घेत असतात.
गुरुवारी झालेल्या अपघाताच्या वेळी लोक सेल्फी घेत असताना थर्ड लेनच्या शेजारी आल्याने हा अपघात झाला.
भरधाव वेगात आलेल्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला.

 

बरेचसे अपघात चालकाच्या चुकीमुळे

 

कात्रजच्या बोगद्यापासून (Katraj tunnel) वारजे पुलाच्या (Warje Bridge) नदीपर्यंत तीव्र उतार आहे. वाहने प्रचंड वेगाने येतात. बरेचसे अपघात हे चालकाच्या चुकीमुळे झाले आहेत.
चालक डिझेल वाचवण्यासाठी गाडी न्युट्रल (Neutral) करतात. न्युट्रल केल्याने आणि गाडीचे इंजिन बंद केल्याने गाडीचा स्पिड वाढतो. इंजिन बंद केल्याने गाड्यांचे ब्रेक लागत नाहीत.
बहुतेक गाड्यांना हायड्रोलिक ब्रेक (Hydraulic brake) असल्याने ब्रेक लागत नाहीत. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतात.

 

स्पीडवर आणि गाडीवर कंट्रोल राहणं गरजेचं

 

देविदास घेवारे यांनी पुढे सांगितले की, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा रोड हायवे असल्याने चालकाने वाहनाचा स्पीड कंट्रोल (Speed control) करणं आणि गाडीवर कंट्रोल राहणं हे फार गरजेचं आहे. बऱ्याचवेळा चालक मद्यापान करुन गाडी चालवतात. वाहन चालकांनी मद्यापान करुन गाडी चालवू नये, असे त्यांनी सांगितले. (Pune Navale Bridge Accident)

 

16 टन गाडीत 25 टन माल

 

महामार्गावरुन धावणाऱ्या मोठ्या गाड्या, कंटेनर हे 16 टनाचे असतात परंतु त्यामध्ये 25 टन माल भरला जातो.
मालाचा जास्त लोड असल्यामुळे धडक बसल्यानंतर याचा इम्पॅक्ट जास्त होतो.

 

म्हणून सर्व्हीस रोड आहे…

 

बऱ्याचवेळेला वाहन चालक हायवेच्या कडेला गाडी उभी करतात. हायवेला कोठेच गाडी थांबवायची नसते असे असताना वाहन चालक गाडी कडेला उभी करता.
तुम्हाला जर गाडी थांबवायची असेल तर सर्व्हिस रोड (Service Road) आहेत.
सर्व्हिस रोडवर गाडी खाली घेऊन रस्त्याच्या कडेला गाडी उभी करावी. परंतु असे होताना दिसत नाही.

 

लोकांनी अपघात होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी

 

लोकांनी स्वत:हून अपघात होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. लोकांनी स्वत:ची काळजी घेतली तर बऱ्यापैकी अपघात कमी होतील.
एंन्ट्री एक्झीट पॉईंटला पाठिमागून गाडी येतेय का ते पाहणे गरजेचं आहे. मात्र काहीवेळा याकडे दुर्लक्ष केले जाते.

 

मग यामध्ये दोष कुणाचा

 

वाहतूक कोंडी झाल्यानंतर महामार्गावर लहान गाड्या युटर्न (U-turn) घेतात. तीव्र उतार असल्याने वाहने भरधाव वेगात येतात हे माहित असताना देखील लोक युटर्न घेतात.
त्यामुळे अपघात होतात. हायवेवर युटर्न घेता येत नाही तरी देखील लोक ऐकत नाहीत, मग यामध्ये दोष कोणाचा.
लोकांमध्ये याचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे घेवारे यांनी सांगितले.

 

अपघात रोखण्यासाठी यंत्रणा आहेत

 

अपघात झाल्यानंतर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाते. अपघात होऊनये यासाठी नॅशनल अ‍ॅथॉरिटी (National Authority) किंवा टोलची एजन्सी आहे
त्यांचा मेन्टन्स (Maintenance) त्याठिकाणी असतो. एचएसपी (HSP) कडे स्पीड कंट्रोल करण्याचे काम आहे. ज्या त्या ऐजन्सीची जी कामे आहेत ती त्यांनी केली पाहिजेत.
एक वर्षापूर्वी सिंहगड रोड पोलिसांनी NAHI ला पत्र देऊन 24 सूचना दिल्या आहेत.
यापैकी काही सूचनांची पुर्तता केली आहे. अद्याप काही प्रलंबीत असल्याची माहिती घेवारे यांनी दिली

 

या उपाययोजना कराव्यात

 

NAHI ने या महामार्गावर एन्ट्री एक्झीट पॉइंट बंद करणं, सर्व्हिस रोडवरून हायवेवर येणाऱ्या गाड्यांसाठी एखादी भींत किंवा बॅरिकेट्स लावणे,
रस्त्याच्या साईड तुटलेल्या आहेत त्या भरुन घेतल्या पाहिजेत, एक्सप्रेस हायवे प्रमाणे या मार्गावर रोपींग करणं गरजेचं आहे.
जेणेकरुन गाडी वेगात असलेली गाडी रोपच्या सहाय्याने जागेवर थांबेल या गोष्टी NAHI ने करायला पाहिजेत.

 

Web Title : Pune Navale Bridge Accident | from 2014 till now 56 dead on pune Navale Bridge accident ! Senior police officials have made it clear that an accident is taking place near Selfie Point due to this reason (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 98 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा

Matchbox Price | 14 वर्षानंतर महागणार ‘काडेपेटी’, दुप्पट होतील दर; उत्पादकांनी सांगितले ‘हे’ कारण