Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ लागोपाठ दुसर्‍या दिवशी अपघात; बोअरवेल ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ‘विजय कुलकर्णी’ जागीच ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | पुणे-सातारा महामार्गावरील (Pune-Satara Highway) अपघाताचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलाजवळ (Pune Navale Bridge Accident) लागोपाठ दुसर्‍या दिवशी अपघात झाला आहे. भरधाव जाणार्‍या बोअरवेल ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला.

विजय रंगनाथ कुलकर्णी Vijay Rangnath Kulkarni (वय ७०, रा.  ऑरा सोसायटी, वडगाव बुद्रुक) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना नवले पुलाजवळील अण्णा वडेवाले हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुलकर्णी हे पुजेचे साहित्य घेऊन दुचाकीवरुन नवले पुलाकडून कात्रजच्या (Katraj News) दिशेने जात होते. त्यावेळी बोअरवेल ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

दुचाकीवरुन कात्रजकडून नवले पुलाच्या (Pune Navale Bridge Accident) दिशेने येत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत सोमवारी सायंकाळी एका महिलेचा मृत्यु झाला होता. पूजा नीलेश कांबळे (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक) असे या महिलेचे नाव आहे. आजारी असल्याने विनोद कदम हे पूजा कांबळे यांना घेऊन रुग्णालयात जात होते. यावेळी नवले पुलाजवळील हॉटेल डेक्कन पॅव्हिलियनसमोर शेजारुन जाणार्‍या ट्रकचा धक्का त्यांच्या दुचाकीला लागला. त्यात दुचाकीवरील पूजा या खाली पडल्या. ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला होता.

Web Title :-  pune navale bridge second day row borewell truck hits two wheeler vijay rangnath kulkarni died in accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये, 18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

 

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

 

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये, 18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

 

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…