पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Navale Bridge Accident | नवीन कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणार्या तीव्र उताराच्या रस्त्यावर नेहमीच प्राणघातक अपघात झाले आहे. आज मात्र कात्रजगावाकडून नवले पुलाकडे येणार्या रस्त्यावर हा विचित्र अपघात शनिवारी सकाळी ११ वाजता घडला.(Pune Navale Bridge Accident)
कात्रजगावाकडून जुन्या बायपायस रोडने एक नवले पुलाकडे येत होता. या रस्त्यावर थोडा उतार आहे. नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पाठीमागून पुढे असलेल्या वाहनाला जोरात धडक दिली. धडक बसलेल्या वाहन पुढे जाऊन पुढे असलेल्या वाहनाला मागून धडकले. त्यात ५ कार, दोन टेम्पो, एका एस टी बसचा समावेश आहे. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. सिंहगड रोड वाहतूक पोलिसांनी (Sinhagad Road Traffic Police) तातडीने धाव घेत येथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार
Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’