Pune – Navale Bridge Accident | नवले पुल : दोन वेगवेळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune – Navale Bridge Accident | पुणे-बंगळुरु महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु आहे. नवले ब्रिज अपघाताचा (Pune – Navale Bridge Accident) हॉटस्पॉट (Hotspot) ठरला असून मंगळवारी (दि.6) दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल आहे. ही घटना नवले पूल आणि वारजे भागात घडली आहे.

बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर (Swami Narayan Temple) परिसरात सेवा रस्त्यावर भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये ठाकुर लखन कुशवाह (वय-28 रा. दत्तनगर) याचा मृत्यू झाला. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास झाला. याबाबत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र कुसवाह (वय-32) याने फिर्याद दिली आहे. (Pune – Navale Bridge Accident)

राजेंद्र आणि त्याचा भाऊ लखन हे पहाटे चारच्या सुमारास बाह्यवळण मार्गावर दुचाकीवरून जात होते.
पहाटे सेवा रस्त्यावर भऱधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लखनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे.
पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख (PSI Mohan Deshmukh) करीत आहेत.

वारजे भागात पिकअप उलटून एकाचा मृत्यू

बाह्यवळण मार्गावर वारजे भागात मालवाहू जीप (पीकअप) उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे.
ओंकार दत्तात्रय पानसरे (वय-21 रा. साकोरी ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी बालाजी काटे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station)
फिर्याद दिली आहे. ओंकार पानसरे भरधाव वेगात साताऱ्याकडे जात होता.
त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटली. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील (PSI Tripti Patil) करीत आहेत.

Web Title :  Pune – Navale Bridge Accident | series of accidents near navale bridge never ends two died in different accidents pune

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanskruti Balgude | मला वाटलं माझ्यावर ॲसिड अटॅक वगैरे होतो की काय…? अभिनेत्री संस्कृती बालगुडेनी सांगितला ‘तो’ किस्सा

Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी

Railway Underpass In Khadki Pune | खडकी येथील रेल्वे अंडरपासचे होणार रुंदीकरण पुणे महापालिका देणार 25 कोटी रुपये

Pune Katraj Vikas Aghadi | कात्रजकरांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकार्‍यांसमवेत 8 जून रोजी कात्रज विकास आघाडीच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन

NCP MLA Rohit Pawar | शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका होत असताना दिग्गज नेते गप्प का?, रोहित पवारांचा स्वपक्षीयांना सवाल