Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात ! सुदैवाने जीवित हानी नाही, वाहनांच्या लांबच लांब रांगा (व्हिडीओ)

पुणे : Pune Navale Bridge Accident | बंगलोर – मुंबई हा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याकडून आलेला नवले पुलापर्यंतचा रस्ता हा मृत्युचा सापळा ठरला आहे. या ठिकाणी सातत्याने प्राणघातक अपघात घडत असतात. मंगळवारी सकाळी नवले पुलाच्या जवळ एका कंटेनरला भीषण अपघात झाला. सुदैवाने यावेळी बाजूला वाहने नसल्याने जीवित हानी झाली नाही. या अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला आहे. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. (Pune Navale Bridge Accident)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातार्‍याकडून एक कंटेनर मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुल संपल्यानंतर कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कंटेनरचा ट्रेलर त्याच्या केबिनवर आदळला़ व तो दुभाजकावर आला. या घटनेत त्यात केबिनचा चक्काचुर झाला. पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून कंटेनर बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हे देखील वाचा

Pune | युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा मंत्री दत्तात्रय भरणे व धिरज केसकर यांच्याकडून विषेश सत्कार

Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात

Coronavirus in India | देशात कोरोना’ची 8865 नवी प्रकरणे आली समोर, 287 दिवसात आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  terrible container accident near navale bridge driver injured traffic jam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update