Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर (Pune Navale Bridge Accident) अपघाताची मालिका सुरुच आहे. नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉईंट (Selfie point) जवळ गुरुवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, आज (शुक्रवार) याच ठिकाणी आणखी एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू (death) झाला आहे. तर 12 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

 

 

शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात झाला असून एका टँकरने (tanker) 13 सिटर ट्रॅव्हलरला (13-seater traveler) जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रॅव्हलर पलटी होऊन सर्व्हिस रोडवर पडली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाल्याचे समजतेय. या अपघातामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

 

नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने वेगात असलेल्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लावणे अश्यक होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार आपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title :- three dead on the spot in Pune Navale Bridge Accident, 12 injured and two are serious

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रीजवर सलग तिसऱ्या दिवशी अपघात ! ट्रकने 8 वाहनांना धडक दिल्याने दोन महिला जखमी

Maharashtra School Reopen | शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून इयत्ता 1 ली ते 4 थी ची शाळा सुरू होण्याचे संकेत

Men’s Health | पुरुषांनी पुरूषांनी ‘या’ 7 गोष्टींचं सेवन आवश्य करावं; टेस्टोस्टेरोन लेव्हल वाढल्याने सेक्स लाईफ चांगली, जाणून घ्या

BJP MLA Madhuri Misal | बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खून खटल्यासंदर्भात भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ajit Pawar | अजित पवारांनी जरंडेश्वर बाबतचे आरोप फेटाळले, ‘त्या’ 65 कारखान्यांची नावे केली जाहीर; किरीट सोमय्यांनाही दिलं ‘हे’ चॅलेंज