Pune Navale Bridge | नवले पुलावरील अपघातांस पुलाची चुकलेली रचना कारणीभूत – एनएचएआय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवले पुलावर (Pune Navale Bridge) सतत होणाऱ्या अपघातांचे कारण म्हणजे या पुलाच्या बांधकामावेळी पुलाची चुकलेली रचना आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक संजय कदम (Sanjay Kadam) यांनी दिली. गेले दोन दिवस म्हणजे रविवार आणि सोमवार नवले पुलावर (Pune Navale Bridge) दोन भीषण अपघात घडले आहेत.

 

नवले पुलावर (Pune Navale Bridge) तीव्र उतार आहे. या उतारामुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. या अपघातांत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. रविवारी रात्री या पुलावर अपघात झाला होता. यावेळी एका भरधाव टँकरने 24 वाहनांना धडक दिली होती. त्यामुळे या वाहनांचे नुकसान झाले होते. तसेच सात ते आठ लोक या अपघातात जखमी देखील झाले होते. तसेच सोमवारी झालेल्या अपघातात एका टेम्पो चालकाने दुचारीस्वाराला धडक दिली होती. त्यात एका दुचारीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे या पुलाची गैरसोय आणि भिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे. या पुलाचा उतार कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे.

 

पुण्यातील नवले पुलावर दररोज अनेक वाहने ये-जा करतात.
या पुलावर तीव्र उतार असल्याने बऱ्याचदा चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो आणि परिणामी अपघात होतात.
आतापर्यंत या पुलावर अनेक अपघात झाले आहेत. त्यात आतापर्यंत 60 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या पुलाच्या रचनेसाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला (NHAI) नागरिक आणि राजकारण्यांनी दोषी ठरविले आहे.
आता प्राधिकरणाने अपघातासाठी महामार्गाची चुकलेली रचना कारणीभूत असल्याचे मान्य केले आहे.

 

Web Title :- Pune Navale Bridge | incorrect design of the highway is responsible for frequent accidents in navale bridge area of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना