Pune Navale Bridge | नवले पूलाची समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका उचलणार ‘हे’ पाऊल, महापौरांनी दिले आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नवले पुलावर (Pune Navale Bridge) सलग तीन दिवस भीषण अपघात (Accident) झाले. नवले पुलावर (Pune Navale Bridge) झालेल्या अपघातांचे पडसाद महापालिकेच्या मुख्यसभेत उमटले. नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पोलीस (Police) यांच्या कारभारावर टीका केली. तसेच कात्रज देहू महामार्गाची (Katraj Dehu Highway) रखडलेली कामे पूर्ण करण्याची मागणी केली. याची महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दखल घेऊन महापालिकेत एनएचएआय, पोलीस विभागांची दोन दिवसात बैठक बोलवा. असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेची मुख्यसभा सुरु झाल्यानंतर नगरसेवक अजित दरेकर (Corporator Ajit Darekar) यांनी नवले पुलावर (Pune Navale Bridge) झालेल्या अपघातांचा विषय उपस्थित केला. या महामार्गावर आत्तापर्यंत 68 नागकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यानंतर NHAI, महापालिकेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, पण सुधारणा होत नसल्याने लोकांची घरे उद्धवस्त होत आहेत, अशी टीका केली.

तर सचिन दोडके (Sachin Dodke) यांनी, राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने सर्व्हिस रोड वारजे वगळता इतर ठिकाणी झालेले नाहीत. यंत्रणांमध्ये समन्वय नाही. सल्लागार काय करतात असा सवाल केला. दिलीप बराटे (Dilip Barate) यांनी नवले पूल येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे यावर तोडगा निघाला पाहिजे. चांदणी चौका (Chandni Chowk) प्रमाणे येथेही उपाययोजना करण्याची मागणी केली. यासाठी महापौरांनी लक्ष घालून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली.

गणेश बिडकर (Ganesh Bidkar) म्हणाले, जेथे चुका आहेत त्या सुधारल्या पाहिजेत. विद्यापीठ चौकातील पूल चुकीचा होता म्हणून पाडला. एवढी चर्चा झाली त्यावर एक उपाय निघावा. बॉटलनेक वर डीपीआर तयार करुन तो सभागृहामध्ये मांडण्यात यावा. त्याला मंजूर करुन काम करावे, असे सांगितले.याच मुद्यावरुन दिलीप वेडे पाटील, हरिदास चरवड, वसंत मोरे, गणेश ढोरे, वर्षा तापकीर, अविनाश बागवे, सुभाष जगताप, अश्विनी कदम, वृषाली चौधरी यांनी आपली भूमिका मांडली.

यावर प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी त्याला नकार दिला.
महापौर म्हणाले, नवले पुलासह इतर विषय मांडले आहेत.
त्याचा एकत्रित विचार करण्यासाठी दोन दिवसात NHAI, पोलीस अधिकारी यांची बैठक महापालिकेत घ्यावी.
येथे झालेल्या चर्चेचा अहवाल नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांना पाठवला जाईल.

हे देखील वाचा

Pune Corporation GB | नाना पेठेतील ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ संस्थेस 30 वर्षे भाडेकरार वाढीस मुदतवाढ;; सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय (Live Video)

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच नवाब मलिकांना उत्तर; म्हणाले – ‘जन्मदाखला माझ्या मूळ गावी जा आणि तपासा’

Pankaja Munde | मोठ्या हेल्थ सेंटरमध्ये देखील गरीबांना माफक दरात सेवा मिळावी – पंकजा मुंडे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Navale Bridge | pune municipal corporation to hold meeting to resolve navle bridge issue orders issued by the mayor muralidhar mohol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update