Pune Navratri Mahotsav | गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त पुणे नवरात्रौ महोत्सवकडून आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारक भास्कर कर्णिक यांच्या स्मारकभोवती सफाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navratri Mahotsav | देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (mahatma gandhi jayanti) व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती (lal bahadur shastri jayanti) निमित्त पुण्यातील फरासखाना मजूरअड्डा (faraskhana majur adda) येथील क्रांतिकारक शहिद भास्कर पांडुरंग कर्णिक (Bhaskar Pandurang Karnik) यांच्या स्मारक येथील स्वच्छता आज पुणे नवरात्रौ महोत्सवतर्फे (Pune Navratri Mahotsav) करण्यात आली. अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या असंख्य कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थित शहिद भास्कर कर्णिक अमर रहे, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय, लालबहादूर शास्त्री की जय अश्या घोषणा देत वातावरण भारावून टाकले. प्रारंभी शहिद भास्कर कर्णिक यांचा स्मृतिस्तंभ पाण्याने स्वच्छ धुवण्यात आला तसेच सारा परिसर स्वच्छ करण्यात आला. आबा बागुल यांच्या हस्ते पुष्पचक्र व पुष्प अर्पण करण्यात आले व सर्व उपस्थितांनी फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

 

 

याप्रसंगी आबा बागुल म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे 25 कार्यक्रम वर्षभर पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Corporation) केले जावेत असा प्रस्ताव मी दिला व तो संमतही झाला आहे. त्याचा सुरवातीचाच कार्यक्रम क्रांतिकारक भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करणे हा असून अन्य अनेक कार्यक्रम आहेत. आज गांधी जयंतीनिमित्त या कार्यक्रमाला आम्ही पुणे नवरात्रौ महोत्सवाने (Pune Navratri Mahotsav) सुरुवात केली आहे. पुणे महानगरपालिका देखील अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम करेल अशी अपेक्षा आहे.असे म्हणून नागरिकांना संबोधित करताना पुढे ते म्हणाले की,ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढे देण्याच्या परंपरेतील ते प्रमुख क्रांतिकारक होते ते ऍमुनेशन फॅक्टरीत कामाला होते. तेंव्हा तेथे तयार केलेले बॉम्ब ते जेवणाच्या डब्यातून आणायचे असे करता करता सुमारे अर्धा ट्रकभर बॉम्ब त्यांनी जमा केले.

यातीलच बॉम्ब हँड ग्रॅनाईटमध्ये रूपांतरित करून पुढे कॅम्प मधील कॅपिटल थिएटरमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आले.
हा ऐतिहासिक क्षण सर्वांनाच ज्ञात आहे. याप्रसंगी झालेल्या धरपकडीमध्ये भास्कर कर्णिक यांना अटक झाली व फरासखाना येथे ठेवण्यात आले.
मात्र पोलिसांच्या अति छळामुळे आपल्याकडून सहकाऱ्यांची नावे उघड केली जाण्याच्या भीतीमुळे,
काळजी वाटल्यामुळे त्यांनी सोबतचे सायनेट खाऊन आत्महत्या केली व अन्य क्रांतिकारकांची नावे गुप्त राखण्यास ते यशस्वी झाले.
त्यांच्या स्मरणार्थ असलेले त्यांचे स्मारक सदैव सर्वांना प्रेरणा देत राहील.
अश्या क्रांतिकारकांची तेजस्वी परंपरा समोर ठेऊन युवकांनी देश हिताच्या कार्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे असे आवाहन आबा बागुल यांनी केले.
यानंतर संपूर्ण परिसर आबा बागुल व त्यांचे पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी हातात खराटा घेऊन स्वच्छ केला.
हा कार्यक्रम बघताना अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल यांनी आभार मानले.

यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे खजिनदार नंदकुमार बानगुडे, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी, सदस्य विलास रत्नपारखी, महेश ढवळे, विकी खन्ना, सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title :- Pune Navratri Mahotsav | Cleaning around the memorial of revolutionary Bhaskar Karnik under the leadership of Aba Bagul from Pune Navratri Festival on the occasion of Gandhi Jayanti and former Prime Minister Lal Bahadur Shastri Jayanti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MAHATRANSCO Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विद्युत मंडळ येथे भरती; जाणून घ्या

Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसर्‍यापूर्वीच 3 टक्क्यांनी वाढणार ‘हाऊस रेंट अलाऊन्स’ (HRA), पगारात होईल पुन्हा वाढ