Pune News : गे जोडीदाराचं लग्न ठरल्याचं समजलं अन् वेगळं होण्याच्या भीतीतून केलं ‘हे’ कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील राष्ट्रीय रसानयशास्त्र प्रयोगशाळेत पीएच. डी करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची हत्या नेमकी कुणी व कशासाठी केली असेल? याचा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता. मात्र या हत्येचा उलगडा पुणे पोलिसांनी २-४ दिवसांतच केला.

काय आहे नेमकं प्रकरण
३० वर्षीय सुरदर्शन बाबुराव पंडित हा तरुण पुण्यातील पाषाण येथे असलेल्या राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेत पीएच.डी करत होता. सुदर्शन हा जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील सुतारवाडी या भागातील रहिवासी आहे. २६ फेब्रुवारी रोजी सुस येथील खिंडीत सुदर्शनचा मृतदेह आढळून आला होता. कोणी ओळखु नये म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता. आज त्यांना या प्रकरणाचा उलगडा करण्यास यश आले. हा खून का करण्यात आला याचे कारण ऐकून पोलीसदेखील हैराण झाले आहेत.

का करण्यात आली हत्या ?
राष्ट्रीय रसानयशास्त्र प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या सुदर्शनची रविराज राजकुमार क्षीरसागर या २४ वर्षीय तरुणाशी डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाली होती. आठ महिन्यांपूर्वी दोघे एकमेकांना भेटले आणि तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. या दरम्यान सुदर्शन पंडित याचे लग्न ठरले. सुदर्शनच्या लग्नाला रविराजने विरोध दर्शवला. लग्नामुळे सुदर्शन आपल्यापासून दूर जाईल, अशी भीती रविराजला वाटत होती. यामुळे दोघांमध्ये वाद सुद्धा झाला होता. अशी माहिती चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

२६ फेब्रवारीला नेमकं काय घडलं ?
सुदर्शन याचे लग्न ठरल्याचे जेव्हा रविराजला ला समजले तेव्हा रविराजने सुदर्शन याला पाषाण हिल परिसरात नेवून त्याचा गळा चिरून खून केला. आणि त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून दगडाने त्याचा चेहरा विद्रुप केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडून देण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणचा तपास सुरु केला तेव्हा सुदर्शन याचे शेवटचं लोकेशन पाषाण हिल आढळून आले तेव्हा तो रविराजसोबत होता, असे समजले. त्यानंतर पोलीस रवीराज याच्या घरी पोहोचले. तेव्हा अटक होण्याच्या भीतीने रविराजनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर पोलिसांनी रविराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.