Pune NCP | ॲड. गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा; पुणे राष्ट्रवादीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | एसटी कर्मचाऱ्यांचे (MSRTC Worker) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचं दिसत आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Pune NCP) सदावर्ते यांच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये (Shivaji Nagar Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) व जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा समाजाबद्दल (Maratha Community) आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. सदर दोन्ही व्यक्ती सातत्याने अश्या प्रकारची वक्तव्ये करत असतात. त्यांची आक्षेपार्ह वक्तव्ये अजूनही समाजमाध्यमांमध्ये पसरवले जात असून यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल ॲड. गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे पुणे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP’s Pune city president Prashant Jagtap) यांनी केली आहे.

 

सर्व जात धर्म प्रांत यांसह गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीची ही संस्कृती नाही असंही प्रशांत जगताप यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे.

 

दरम्यान, यावेळी निवेदन देताना, प्रवक्ते प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), पुजा झोळे, विनोद पवार, रोहन पायगुडे,
चंन्द्रशेखर धावडे, राहुल तांबे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Advt.

Web Title :- Pune NCP | A case should be registered against Gunaratna Sadavarte and Jayashree Patil Demand of Pune NCP

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा