Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे महानगरपालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेची Pune Municipal Corporation (PMC) मुदत संपल्याने महापालिकेवर प्रशासकाची (Administrator) नेमणुक करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने प्रशासक विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करेल अशी खात्री शिष्टमंडळाने दिली.

 

पुणे महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्त झालेले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) शिष्टमंडळाने भेट घेतली. महापौर (Mayor), सभागृह नेते, स्थायी समिती सभापती (PMC Standing Committee Chairman) यांचा कार्यकाळ जरी संपला असला तरी, पुणेकरांच्या समस्या मात्र संपल्या नाहीत. येत्या काळात निवडणुकांचा (Election) कालावधी जरी लांबला तरी विक्रम कुमार यांच्या माध्यमातून पुणेकरांच्या समस्या सुटतील. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करेल अशी खात्री शिष्टमंडळाने दिली.

या शिष्टमंडळात माजी महापौर राजलक्ष्मी भोसले (Former Mayor Rajlaxmi Bhosale), वैशाली बनकर (Former Mayor Vaishali Bankar), माजी उपमहापौर दिपक मानकर (Former Deputy Mayor Deepak Mankar), दिलीप बराटे (Former Deputy Mayor Dilip Barate), माजी सभागृह नेते सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap), स्थायी समितीचे माजी चेअरमन विशाल तांबे (Corporator Vishal Tambe), बाबुराव चांदेरे (Corporator Baburao Chandere), अश्विनी कदम (Corporator Ashwini Kadam), बाळासाहेब बोडके (Corporator Balasaheb Bodke), नगरसेवक सचिन दोडके (Corporator Sachin Dodke), शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ (Pradip Dhumal), आदी उपस्थित होते.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Pune NCP | A delegation of NCP met PMC Vikram Kumar Administrator Pune Municipal Corporation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा