Pune NCP | राजकीय पोळी भाजण्यासाठी चित्रा वाघ यांनी ‘त्या’ मुलीच्या भावनांचा वापर केला, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या दोन महिन्यांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) या माध्यमांसमोर वारंवार काही नेत्यांवर बलात्काराचे (Rape) आरोप (Allegations) करत एका पीडित मुलीची कथित व्यथा समाज माध्यमांमध्ये सांगत होत्या. मात्र त्या मुलीने काल स्वतः पत्रकारांना भेटून हे सर्व आरोप खोटे असून चित्रा वाघ यांनी जाणीवपूर्वक हे सर्व आरोप करण्यास भाग पाडले असल्याचे सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी (Pune NCP) युवती काँग्रेस पुणे शहर अध्यक्षा सुषमा सातपुते (Sushma Satpute) यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना म्हणाल्या, राजकीय पोळी भाजण्यासाठी चित्रा वाघ यांनी त्या मुलीच्या भावनांचा (Emotions) वापर केला आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर (Rani Lakshmibai Statue) निषेध आंदोलन (Agitation) करण्यात आले त्यावेळी सुषमा सातपुते बोलत होत्या..

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवती काँग्रेस (Pune NCP) पुणे शहर अध्यक्षा सुषमा सातपुते म्हणाल्या, गेल्या दोन महिन्यांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ या माध्यमांसमोर वारंवार काही नेत्यांवर बलात्काराचे आरोप करत एका पीडित मुलीची कथित व्यथा समाज माध्यमांमध्ये सांगत होत्या. या सर्व काळात चित्रा वाघ यांनी अतिशय घाणेरडे आरोप करत संबंधित नेत्याबाबत अनेक वक्तव्ये केली. अखेर या प्रकरणातील मुलीने काल स्वतः पत्रकारांना भेटून हे सर्व आरोप खोटे असून चित्रा वाघ यांनी जाणीवपूर्वक हे सर्व आरोप करण्यास भाग पाडले असे सांगितले. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून आपले राजकीय पोळी भाजण्यासाठी चित्रा वाघ यांनी या मुलीच्या भावनांचा निव्वळ वापर केल्याचा आरोप सातपुते यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, राजकारणात दावे-प्रतिदावे आरोप-प्रत्यारोप करायचे असतात, परंतु हे आरोप प्रत्यारोप करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला बलात्कारासारख्या गुन्ह्यात (Crime) अडकवणे, एखाद्या मुलीच्या भावनांशी खेळणे हे खरोखर घृणास्पद असून, चित्रा वाघ यांच्या या वर्तणुकीमुळे सर्वत्र संतापाची लाट असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ज्या महाराष्ट्र राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule), पहिल्या शिक्षिका फातीमा (First Teacher Fatima), पहिल्या डॉक्टर आनंदीबाई (First Doctor Anandibai) या सर्व थोर महिलांची परंपरा या महाराष्ट्राला आहे, अशा या महाराष्ट्राच्या भूमीत एक महिला दुसऱ्या महिलेचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करते यापेक्षा दुसरे दुर्दैव कुठले असेल. या ज्या राजकीय पक्षाच्या सदस्य आहेत, त्या भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का….? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अशाप्रकारे महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने या आंदोलन प्रसंगी करण्यात आली.

या आंदोलन प्रसंगी राजलक्ष्मी भोसले (Rajalakshmi Bhosale), सुषमा सातपुते, प्रवक्ते प्रदीप देशमुख
(Spokesperson Pradip Deshmukh), मृणालिनी वाणी, लावण्या शिंदे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, पायल चव्हाण,
सानिया झुंजारराव, अपर्णा पाटसकर, श्रद्धा जाधव,
निलम खुडे, ऋतुजा देशमुख, अबोली सुपेकर, मयुरी तोडकर,पूजा नाशिककर, अर्चना चंदनशिवे, अर्चना रिठे, अनिता पवार,
आरती गायकवाड, शिला जगताप, आरती गायकवाड, राखी श्रीराव, ज्योती सूर्यवंशी,
हालिमा शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात युवती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title : Pune NCP | Chitra Wagh used the sentiments of that girl for
political gain, a serious allegation of the NCP

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा